عَنْ جَابِرِ بْنِ عَبْدِ اللَّهِ رَضِيَ اللَّهُ عَنْهُما قَالَ:
كَانَ رَسُولُ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ فِي سَفَرٍ، فَرَأَى زِحَامًا وَرَجُلًا قَدْ ظُلِّلَ عَلَيْهِ، فَقَالَ: «مَا هَذَا؟»، فَقَالُوا: صَائِمٌ، فَقَالَ: «لَيْسَ مِنَ البِرِّ الصَّوْمُ فِي السَّفَرِ»، وَفِي لَفْظٍ لِمُسلِمٍ: «عَلَيْكُمْ بِرُخْصَةِ اللهِ الَّذِي رَخَّصَ لَكُمْ».
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 1946]
المزيــد ...
हजरत जाबिर बिन अब्दुल्ला अल्लाह राजी असो त्यांच्याशी कथन करतात की:
प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर एका प्रवासात असतांना, त्यांनी लोकांचा जमाव बघितला, लोकांनी एका व्यक्तिवर छत्री धरुन ठेवली होती, उन्ह लागु नये म्हणून, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर सवाल केला:<<हे सर्व काय आहे?>>,
लोकांनी उत्तर दिले की:सदर व्यक्ती उपवासधारक(रोजे दार) आहे,
प्रेषित सलामती असो त्यांच्यावर म्हणाले की: <<प्रवासात ऊपवास ठेवणे पुण्यकर्म नाही>>,
अन्य मुस्लीम ग्रंथात नमुद आहे की: प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की:<<अल्लाह ने दिलेल्या संधीचा फायदा उचलावा,जे त्याने तुम्हाला प्रदान केली आहे>>.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 1946]
प्रेषित सलामती असो त्यांच्यावर एका प्रवासात असतांना, त्यांनी एका व्यक्तीजवळ लोकांची गर्दि बघितली, कडक उन्हामुळे व तहानेने व्याकुळ झाल्यामुळे त्याच्यावर लोकांनी सावली धरली होती, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर विचारले की: या व्यक्तीला काय झाले आहे? लोकं म्हणाली की:याने उपवास धरला आहे, त्यावर प्रेषित सलामती असो त्यांच्यावर म्हणाले: प्रवासात ऊपवास ठेवणे पुण्याचे प्रतिक नाहीच, त्याउलट सर्वोच्च अल्लाह ने दिलेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला पाहिजे, जी त्याने तुम्हाला दिलेली आहे.