عَنِ الزُّبَيْرِ بْنِ العَوَّامِ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ عَنِ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«لَأَنْ يَأْخُذَ أَحَدُكُمْ حَبْلَهُ، فَيَأْتِيَ بِحُزْمَةِ الحَطَبِ عَلَى ظَهْرِهِ، فَيَبِيعَهَا، فَيَكُفَّ اللَّهُ بِهَا وَجْهَهُ خَيْرٌ لَهُ مِنْ أَنْ يَسْأَلَ النَّاسَ أَعْطَوْهُ أَوْ مَنَعُوهُ».
[صحيح] - [رواه البخاري] - [صحيح البخاري: 1471]
المزيــد ...
जुबैर बिन अव्वाम रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की:
<<तुमच्या पैकी कुणी व्यक्ती आपल्या सोबत दोरी घेउन उंच टेकडीवर जाऊन, तिथुन ईंधनाचा भारा पाठीवर आणत असेल व तो भारा विकत असेल व त्यामुळे अल्लाह त्याला लोकांसमोर हात पसरवण्यापासुन वाचवत असेल तर हे, त्याच्या साठी बेहत्तर आहे की लोकांना मागत फिरावे लोकांची ईच्छा असेल तर देतील अन्यथा हात वर करतील.
[صحيح] - [رواه البخاري] - [صحيح البخاري - 1471]
प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी श्रद्धावानांना समज दिली आहे, की इतरांसमोर हात पसरवण्या ऐवजी ते सर्व काम मेहनत मजदुरी चे असले तरी मान्य आहे, मग जर ऊंच टेकडी वर चढुन ईंधनाचा भारा आणुन विकुण, आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह किंवा दानधर्म साठी खर्च केला तरी हरकत नाही, पण लोकांना मागणे, हलकट पणाचे लक्षण आहे, व न मागणे स्वाभिमानी असण्याचे प्रतिक आहे, खरी गोष्ट हि आहे की, मोमीन [श्रद्धावान] हा स्वाभिमानी असतो अपमानीत किंवा हिन दर्जाचा नसतोच.