عَنْ عَبْدِ اللَّهِ بْنِ مَسْعُودٍ رَضيَ اللهُ عنهُ قَالَ:
قَالَ لِي النَّبِيُّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ: «اقْرَأْ عَلَيَّ»، قُلْتُ: يَا رَسُولَ اللَّهِ، أَأَقْرَأُ عَلَيْكَ، وَعَلَيْكَ أُنْزِلَ؟ قَالَ: «نَعَمْ» فَقَرَأْتُ سُورَةَ النِّسَاءِ حَتَّى أَتَيْتُ إِلَى هَذِهِ الآيَةِ: {فَكَيْفَ إِذَا جِئْنَا مِنْ كُلِّ أُمَّةٍ بِشَهِيدٍ، وَجِئْنَا بِكَ عَلَى هَؤُلاَءِ شَهِيدًا} [النساء: 41]، قَالَ: «حَسْبُكَ الآنَ» فَالْتَفَتُّ إِلَيْهِ، فَإِذَا عَيْنَاهُ تَذْرِفَانِ.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 5050]
المزيــد ...
अब्दुल्ला बिन मसुद अल्लाह राजी असो त्यांच्याशी कथन करतात की:
प्रेषित मुहम्मद सलामती असो त्यांच्यावर मला उद्देशून सांगितले की:<<माझ्या समक्ष कुरआन पठण करा>>
मी म्हणालो: हे प्रेषिता, काय मी तुमच्या समक्ष पठण करु, सत्य हे आहे की, तुमच्यावर तर [वही] आसमानी संदेश चे अवतरण झाले?
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की:<<होय>>
बस्स मग काय मी सुरह निसा चे पठण सुरू केले, ईथपावेतो की मी सदर आयती पर्यंत पोहचलो असता:{फकयफा ईजा जिअना मिन कुल्ली ऊम्मतिन बिशहिद व जिअना बिका अला हावउलाइ शहिदा} [निसा: ४१],
तेव्हा प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर ईशारा केला की:<<बस्स करा एवढे पुरेसे आहे>>
मग जेव्हा मी बघितलं तेव्हा प्रेषितांचे सलामती असो त्यांच्यावर डोळे पाणावले होते.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 5050]
प्रेषित सलामती असो त्यांच्यावर अब्दुल्ला बिन मसुद अल्लाह राजी असो त्यांच्याशी ला म्हणाले की:तुम्ही कुरआन चा काही भाग माझ्या समक्ष पठण करावा, ईब्ने मसुद नम्रतेने म्हणाले:हे प्रेषिता, मी का बरे पठण करु शकतो, कुरआन तर साक्षात तुम्हावर अवतरीत झाला आहे?! प्रेषितांनी सलामती त्यांच्यावर फरमाविले:माझी तिव्र ईच्छा आहे की, मी दुसऱ्या कडुन कुरआन ऐकावे, मग ईब्ने मसुदांनी अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर सुरह निसा चे पठण सुरू केले, जेव्हा ते या आयतीवर पोहचले:{फकयफा ईजा जिअना मिन कुल्ली ऊम्मतिन बिशहिद व जिअना बिका अला हावउलाइ शहिदा}. अर्थात त्या दिवशी काय अवस्था होईल? जेव्हा आम्ही तुम्हाला त्या लोकांवर साक्षीदार बनवु की तुम्ही आपल्या (उम्मत) जनसमुहा समोर अल्लाह चा संदेश पोहचविला, तेव्हा प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले:आता बस्स पठण थांबवा, ईब्ने मसुद अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर सांगतात की: मी जेव्हा प्रेषितांकडे सलामती असो त्यांच्यावर बघितले, तेव्हा पैगंबरांचे डोळे अल्लाह च्या भितीने व उम्मत च्या प्रेमापोटी व दयालुतेमुळे पाणावले होते.