عَنْ حُذَيْفَةَ رَضيَ اللهُ عنه قَالَ:
كُنَّا إِذَا حَضَرْنَا مَعَ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ طَعَامًا لَمْ نَضَعْ أَيْدِيَنَا حَتَّى يَبْدَأَ رَسُولُ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ فَيَضَعَ يَدَهُ، وَإِنَّا حَضَرْنَا مَعَهُ مَرَّةً طَعَامًا، فَجَاءَتْ جَارِيَةٌ كَأَنَّهَا تُدْفَعُ، فَذَهَبَتْ لِتَضَعَ يَدَهَا فِي الطَّعَامِ، فَأَخَذَ رَسُولُ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ بِيَدِهَا، ثُمَّ جَاءَ أَعْرَابِيٌّ كَأَنَّمَا يُدْفَعُ فَأَخَذَ بِيَدِهِ، فَقَالَ رَسُولُ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ: «إِنَّ الشَّيْطَانَ يَسْتَحِلُّ الطَّعَامَ أَنْ لَا يُذْكَرَ اسْمُ اللهِ عَلَيْهِ، وَإِنَّهُ جَاءَ بِهَذِهِ الْجَارِيَةِ لِيَسْتَحِلَّ بِهَا فَأَخَذْتُ بِيَدِهَا، فَجَاءَ بِهَذَا الْأَعْرَابِيِّ لِيَسْتَحِلَّ بِهِ فَأَخَذْتُ بِيَدِهِ، وَالَّذِي نَفْسِي بِيَدِهِ، إِنَّ يَدَهُ فِي يَدِي مَعَ يَدِهَا».
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم: 2017]
المزيــد ...
हुझैफा रजिअल्लाहु अनहु सांगतात:
जेव्हा आम्ही प्रेषितांसोबत [अल्लाहची सलामती असो त्यांच्यावर] जेवण करायचो, तर आम्ही तोपर्यंत आपले हात ताटात टाकत नव्हतो, जोपर्यंत प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम आपल्या पवित्र हाताने सुरुवात करत नसत, एकदा आम्ही प्रेषितां समवेत भोजनाला बसलो असतांना, अचानक एक मुलगी धावत आली, जणुकाही तिचा कुणी पाठलाग करत असेल, तिने आपले हात सरळ ताटात टाकले परंतु प्रेषितांनी तिचा हात धरला, त्याबरोबर एक खेड्याचा माणुस आला व त्याने सुद्धा ताटात हात टाकला, त्याचा हात सुद्धा प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी पकडला, मग प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी आम्हाला सांगितले की<<शैतान स्वतासाठी असे जेवण वैध करतो, ज्या घासावर अल्लाहचे नाव न घेतल्या गेले,म्हणुनच शैतान ने या मुलाला आणले, ज्याने त्याला भोजन वैध होईल, म्हणुन मी त्याचा हात पकडला, मग त्या शैतान खेड्याच्या माणसाला घेउन आला, ज्याद्वारे त्याला जेवण हलाल म्हणजे वैध होईल, मग मी त्याचाही हात पकडला, ज्मग प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम म्हणाले, शपथ आहे, त्याची ज्याच्या हातात माझा जिव आहे! शैतान चा हात त्या मुलाच्या हातासोबत माझ्या हातात आहे, मग प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी अल्लाह चं नाव घेतलं व भोजन केलं>>.
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم - 2017]
हुझैफा रजिअल्लाहु अनहु सांगतात की जेव्हा आम्ही प्रेषितांसोबत जेवण करत होतो, तेव्हा तोपर्यंत आम्ही ताटात हात टाकत नव्हतो, जोपर्यंत प्रेषित सुरू करत नव्हते, एक मुलगी धावत आली व ताटात हात टाकु लागली, व बिसमील्लाह [अल्लाहच्या नावाने] न म्हणता घास घेण्याच्या बेतात होती, तिचा हात प्रेषितांनी पकडला, त्यानंतर तिथे एक खेड्याचा माणुस आला व त्याने सुद्धा ताटात हात टाकण्याचा प्रयत्न केला, त्याला सुद्धा प्रेषितांनी रोकले, त्यानंतर प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी सोबत्यांना सांगितले की: त्या मुलीला व माणसाला शैतान घेउन आला होता, व त्याद्वारे त्याचा प्रयत्न असा होता की, बिस्मिल्लाह न म्हणता जेवण सुरू केल्याने, ते जेवण त्याच्या करता [हलाल ] वैध झाले असते, मग प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी अल्लाह ची शपथ घेउन सांगितले की त्या दोघांच्या हाता सोबत शैतान चा हात प्रेषितांच्या हातात होता.