+ -

عَنْ عَبْدِ اللَّهِ بْنِ يَزِيدَ الخَطْمِيِّ قَالَ: حَدَّثَنِي البَرَاءُ وَهُوَ غَيْرُ كَذُوبٍ، قَالَ:
كَانَ رَسُولُ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ إِذَا قَالَ: سَمِعَ اللَّهُ لِمَنْ حَمِدَهُ، لَمْ يَحْنِ أَحَدٌ مِنَّا ظَهْرَهُ حَتَّى يَقَعَ النَّبِيُّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ سَاجِدًا، ثُمَّ نَقَعُ سُجُودًا بَعْدَهُ.

[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 690]
المزيــد ...

Translation Needs More Review.

अब्दुल्ला बिन यजिद खतमी अंसारी अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कथन करतात की: त्यांना बराअ अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर जे खोटारडे नाहितच नि सांगितले की:
प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर जेव्हा समीअल्लाह लीमन हमिदा उच्चारत तेव्हा आमच्यापैकी कुणीच तोपर्यंत आपली पाठ (नतमस्तक) वाकवत नव्हतो, जोपर्यंत प्रेषित सलामती असो त्यांच्यावर पुर्णत सज्दा नतमस्तक होत नव्हते, प्रेषितांच्या सलामती असो त्यांच्यावर नंतर आम्ही सज्दा (नतमस्तक) मध्ये जात होतो.

[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 690]

Explanation

पैगंबरांचे खरेखुरे सहाबी बराअ बिन आजिब अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर प्रेषितांच्या अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर नमाज बाबत वर्णन करत होते, नमाज मधे प्रेषित मुहम्मद सलामती असो त्यांच्यावर आपल्या सहाबांची ईमामत म्हणजे नेतृत्व करत होते, पैगंबरांच्या मागे नमाज पठण करणारे, प्रेषितांचे सलामती असो त्यांच्यावर एक एक आचरण पुर्ण झाल्यावरच सहाबी आपले आचरण पुर्ण करत असत, प्रेषित सलामती असो त्यांच्यावर जेव्हा रुकु म्हणजे वाकुन ताट उभे राहत तेंव्हा समिअल्ला लिमन हमिदा पैगंबरांचे सोबती पैगंबरा ऩंतरच आपले डोके उचलत असत, तसेच जेव्हा प्रेषित सलामती असो त्यांच्यावर जेव्हा पुर्णत सज्दा जमिनीवर डोकं टेकवत असत त्या नंतरच अनुयायी सहाबी सज्दा करता जमीनीवर डोकं टेकवत असत.

Benefits from the Hadith

  1. सहाबांचे अनुकरण वाखाणण्याजोगे होते,
  2. सहाबा प्रेषितांचे सलामती असो त्यांच्यावर अनुकरण ईतके काटेकोरपणे करत होते की, तोपर्यंत नतमस्तक होण्याकरता वाकत नव्हते, जोपर्यंत प्रेषित मुहम्मद सलामती असो त्यांच्यावर आपला सज्दा पुर्ण करत नव्हते.
  3. ईब्ने दकिक अलईद रहमतुल्लाह सांगतात की: सदर हदिस वरुन सिद्ध होते की प्रेषितांच्या सलामती असो त्यांच्यावर नमाज मध्ये पुर्ण विलंब व शांतता असायची.
  4. नमाज मध्ये ईमाम चे अनुकरण करणाऱे चार प्रकारात मोडतात:
  5. १-मुसाबकत: (घाई करणारे)
  6. नमाज चे ईमाम (नेतृत्व) च्या पहिलेच मुळस्तंभ अदा करणे, उदाहरणार्थ ईमाम च्या रुकु करण्या पुर्विच रुकु मध्ये जाणे, किवा ईमाम च्या सज्दा मध्ये जाण्यापुर्वी सज्दा मध्ये दाखल होणे, हराम आहे, जर एखाद्या व्यक्तीला माहीत असेल की हे सर्व हराम आहे, आणी तरीही तो जाणुनबुजून ईमाम च्या पहिलेच सर्व प्रक्रिया करत असेल तर त्याची नमाज (रद्द) म्हणजे बातिल होते, मग जर कुणी मुळस्तंभ ईमाम च्या पहिलेच करतो किंवा मुळस्तंभ रुक्न पर्यंत पोहचण्यात घाई करत असेल, आणी जर तकबिर ए तहरिमा वेळीच घाई करुन पुढे गेला तर मात्र त्याची सरसकट नमाज अदा होत नाही, आणी त्याला नमाज पुन्हा अदा करणे जरुरी आहे.
  7. २) मुवाफकत:(समान वेळी क्रिया अदा करणे)
  8. म्हणजे ईमाम सोबतच रुकु करणे, तसेच सोबतच सज्दा करणे, किंवा सोबतच उभे राहणे, कमीत कमी हे मकरुह (अमान्य) आहे, परंतु स्पष्ट प्रमाणावरुन हे सुद्धा हराम आहे; आणी जर कुणी तकबिर ए तहरिमा वेळीच समानान्तर क्रिया अदा केली तर त्याची नमाज अदा होत नाही, त्याला पुन्हा अदा करणे जरुरी आहे.
  9. ३-मुताबअत: (अनुकरण करणे)
  10. म्हणजे ईमाम च्या नंतर ताबडतोब नमाज मधील क्रिया अदा करणे, विनाकारण वेळ न घालवता, हिच पद्धत आवश्यक आहे, व सुन्नत नुसार प्रमाणीत आहे.
  11. ४- तखल्लुफ (मागे राहणे, दिरंगाई करणे)
  12. अर्थात इमाम च्या खुप मागे राहणे ईतके की त्या ईमाम चे अनुकरण समाप्त व्हावे, ऊदा ईमाम रुकु मध्ये गेला परंतु नमाजी मात्र उभाच राहावा, इथपर्यंत की ईमाम रुकु मधुन उठण्याच्या जवळ पोहचत असेल तर हि पद्धत सिद्ध प्रमाणाच्या विरुद्ध आहे, आणी हराम आहे, फक्त अपवाद एवढा आहे की जर रास्त कारण असेल जसे आजार किंवा वयोवृद्ध पणा.
Translation: English Urdu Spanish Indonesian Uyghur Bengali French Turkish Russian Bosnian Sinhala Indian Chinese Persian Vietnamese Tagalog Kurdish Hausa Portuguese Swahili Thai Assamese Dutch Gujarati Dari Hungarian الجورجية المقدونية الخميرية
View Translations
More ...