Category: Virtues and Manners .

عَنْ إِيَاسِ بْنِ عَبْدِ اللَّهِ بْنِ أَبِي ذُبَابٍ رَضيَ اللهُ عنه قَالَ: قَالَ رَسُولُ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«لَا تَضْرِبُوا إِمَاءَ اللَّهِ» فَجَاءَ عُمَرُ إِلَى رَسُولِ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ فَقَالَ: ذَئِرْنَ النِّسَاءُ عَلَى أَزْوَاجِهِنَّ، فَرَخَّصَ فِي ضَرْبِهِنَّ، فَأَطَافَ بِآلِ رَسُولِ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ نِسَاءٌ كَثِيرٌ يَشْكُونَ أَزْوَاجَهُنَّ، فَقَالَ النَّبِيُّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ: «لَقَدْ طَافَ بِآلِ مُحَمَّدٍ نِسَاءٌ كَثِيرٌ يَشْكُونَ أَزْوَاجَهُنَّ، لَيْسَ أُولَئِكَ بِخِيَارِكُمْ».

[صحيح] - [رواه أبو داود وابن ماجه] - [سنن أبي داود: 2146]
المزيــد ...

Translation Needs More Review.

इयास बिन अब्दुल्ला बिन अबी जुबाबा सांगतात की प्रेषित मुहम्मद सलामती असो त्यांच्यावर फरमावितात की:
<<अल्लाह च्या दासींना [महिलांना] मारु नका>> मग उमर बिन खत्ताब रजिअल्लाहु अनहु प्रेषितांजवळ तक्रार करत म्हणाले की:महिला आपल्या पतिंवर वरचढ ठरत आहेत व अवज्ञा करत आहेत, त्यावर प्रेषितांनी [सलामती असो त्यांच्यावर] त्यांना समज देण्याकरता हलका मार मारण्याची परवानगी दिली, तद्नंतर प्रेषितांच्या [सलामती असो त्यांच्यावर] घरी अनेक महिला तक्रार करत दाखल झाल्या, त्यावर प्रेषितांनी [ सल्लल्लाहु अलैही व सल्लम] फरमाविले की:<<मुहम्मद च्या घरच्यांजवळ अनेक महिला तक्रार करत आल्या,व ते पुरुष पुरुषोत्तम नाहीत>>.

[صحيح] - [رواه أبو داود وابن ماجه] - [سنن أبي داود - 2146]

Explanation

सुरुवातीला प्रेषितांनी [सलामती असो त्यांच्यावर] स्त्रीयांना मारण्यास मनाई केली होती, नंतर उमर बिन खत्ताब रजिअल्लाहु अनहु प्रेषितांजवळ तक्रार करत म्हणाले की: महिला आपल्या पतिंची अवहेलना व उद्धटपणे वागत आहेत. त्यावर प्रेषितांनी [सलामती असो त्यांच्यावर] अशा उद्धट वर्तणुक करणाऱ्या साठी, त्यांना सौम्य मारण्याची परवानगी दिली, परंतु जबर मार नसावा. त्यानंतर पुष्कळ महिला प्रेषितांच्या [सलामती असो त्यांच्यावर] पत्नी जवळ तक्रार घेऊन आल्या, की त्यांना त्यांचे पती नाहक जबर मारत आहेत, त्यावर प्रेषितांनी [सलामती असो त्यांच्यावर] फरमाविले की: जे पुरुष आपल्या पत्नीला मारतात ते आदर्श [चांगले]पुरुष नाहीत.

Benefits from the Hadith

  1. महिलांसोबत सदव्यवहार करावा व नम्रतेने वागावे, हे उत्तम आचरण आहे,
  2. पत्नी बाबत संयमाने व लहान सहान गोष्टींना टाळावे.
  3. सर्वोच्च अल्लाह ने स्पष्ट केले आहे की:(ज्या महिलांबाबत तुम्हाला अवहेलना व अवज्ञा ची भीती वाटते, त्यांना समजावुन सांगा किंवा झोपणे वेगळे करावे व जरुरी वाटल्यास हल्का मार मारावा जर त्या तुमचं ऐकत असल्यास अन्याय व जुलुम चे मार्ग शोधु नका निश्चितच अल्लाह सर्वश्रेष्ठ आणि महान आहे) [निसा:३४],
  4. याचा अर्थ आहे,
  5. पहिले समजावून सांगावे,
  6. जर यश‌ न मिळाल्यास झोपणे वेगळे करावे,
  7. अजुनही सुधारणा झाली नाही तर हलका व सौम्य मार मारावा ज्यात ईजा न व्हावी,
  8. हे तिन टप्पे मरहलेवार आहेत, एकाचवेळी यावर अमल करणे शक्य नाही.
  9. पुरुष घराचा प्रमुख व जबाबदार आहे, त्याने आपल्या घरच्या मंडळींना संस्कारीत करावे, प्रेमाने व नरमाईने.
  10. जर एखादा निर्णय फतवा चुकीचा सिद्ध होत असल्यास, प्रमुखांना कळवणे जरुरी आहे.
  11. जर कुणावर जुलुम अन्याय झाल्यास त्याने प्रमुखां समोर आपली फिर्याद मांडावी.
View Translations
Language: English Urdu Spanish More ... (33)
More ...