عَنْ حَكِيمِ بْنِ حِزَامٍ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ قَالَ:
سَأَلْتُ رَسُولَ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ فَأَعْطَانِي، ثُمَّ سَأَلْتُهُ فَأَعْطَانِي، ثُمَّ قَالَ لِي: «يَا حَكِيمُ، إِنَّ هَذَا المَالَ خَضِرٌ حُلْوٌ، فَمَنْ أَخَذَهُ بِسَخَاوَةِ نَفْسٍ، بُورِكَ لَهُ فِيهِ، وَمَنْ أَخَذَهُ بِإِشْرَافِ نَفْسٍ لَمْ يُبَارَكْ لَهُ فِيهِ، وَكَانَ كَالَّذِي يَأْكُلُ وَلاَ يَشْبَعُ، وَاليَدُ العُلْيَا خَيْرٌ مِنَ اليَدِ السُّفْلَى»، قَالَ حَكِيمٌ: فَقُلْتُ: يَا رَسُولَ اللَّهِ، وَالَّذِي بَعَثَكَ بِالحَقِّ لاَ أَرْزَأُ أَحَدًا بَعْدَكَ شَيْئًا حَتَّى أُفَارِقَ الدُّنْيَا، فَكَانَ أَبُو بَكْرٍ يَدْعُو حَكِيمًا لِيُعْطِيَهُ العَطَاءَ، فَيَأْبَى أَنْ يَقْبَلَ مِنْهُ شَيْئًا، ثُمَّ إِنَّ عُمَرَ دَعَاهُ لِيُعْطِيَهُ، فَيَأْبَى أَنْ يَقْبَلَهُ، فَقَالَ: يَا مَعْشَرَ المُسْلِمِينَ، إِنِّي أَعْرِضُ عَلَيْهِ حَقَّهُ الَّذِي قَسَمَ اللَّهُ لَهُ مِنْ هَذَا الفَيْءِ، فَيَأْبَى أَنْ يَأْخُذَهُ. فَلَمْ يَرْزَأْ حَكِيمٌ أَحَدًا مِنَ النَّاسِ بَعْدَ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ حَتَّى تُوُفِّيَ رَحِمَهُ اللَّهُ.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 2750]
المزيــد ...
हकीम बिन हजाम रजिअल्लाहु अनहु स्वतः विषयी सांगतात की:
मी प्रेषितांजवळ पैसाचा सवाल केला, प्रेषितांनी [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर]मला पैसे दिले, मी पुन्हा मागीतले, प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी मला पुन्हा दिले, मी अजुन सवाल केला, प्रेषितांनी मला पुन्हा दिलं,
तद्नंतर मला समजाविले की, अरे!<< हकीम,हा पैसा व संपत्ती आकर्षक व गोड आहे,बस्स ज्याने याला उदार व भरलेल्या त्रुप्त मनाने घेतले, त्याच्या करता त्यात बरकत टाकली जाते, व ज्याने या मालमत्तेला हवास्यापोटी व लालसेने घेतले त्याची बरकत समाप्त करण्यात येते, व तो व्यक्ती असा बनतो,जसे जेवण तर करतो पण पोट भरत नाही, देणारा हात घेणाऱ्या माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे>>,
हकीम बिन हजाम रजिअल्लाहु अनहु सांगतात की:यावर मी म्हणालो की:हे प्रेषिता ! [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर] त्या अल्लाह ची शपथ ज्याने तुम्हाला सत्यधर्मानिशी पाठविले, यापुढे मी मरण येईपर्यंत कुणालाही काहीच मागणार नाही,
तद्नंतर अबुबक्र सिद्दीक रजिअल्लाहु अनहु नी हकीम बिन हजाम ला काही भेट देण्यासाठी बोलाविले परंतु ते नकार देत असत, नंतर उमर बिन खत्ताब रजिअल्लाहु अनहु नी सर्वांसमोर घोषणा केली बाबतीत की, मुस्लीम बांधवांनो;मी हकीम च्या बाबतीत तुम्हाला साक्षीदार ठरवतो, माल फै मधे अल्लाह कडुन ठरविलेला हक्क आहे, मी यांना सादर केला परंतु ते याला घेण्यास नकार देतात, त्याच्या मरणापर्यंत हकीम बिन हिजाम रजिअल्लाहु अनहु नी प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नंतर ईतर कुणाकडेच हात पसरविला नाही.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 2750]
हकीम बिन हजाम रजिअल्लाहु अनहु नी प्रेषितांना पैसे किंवा तत्संबंधी वस्तु मागीतली, पैगंबरांनी [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर] त्यांना भरभरुन दिले, पुन्हा मागीतले प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी पुन्हा दिले, त्यानंतर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी समजाविले की: अरे हकीम, हि मोहमाया व संपत्ती ची आशा फार गोड व आकर्षक आहे, जो व्यक्ती या मालमत्तेला कुणाकडुन न मागता व लोभ न बाळगता स्वीकारतो, तेव्हा त्यात बरकत टाकली जाते, जो व्यक्ती या मालमत्तेला हवास्यापोटी व लालसेने स्वीकारतो त्याच्याकरता त्यात बरकत समाप्त केली जाते, त्या व्यक्तीचे उदाहरण आहे, जो जेवण तर करतो परंतु त्याचे पोट भरत नाही, व देणारा हात घेणाऱ्या हातापेक्षा श्रेष्ठ आहे, हकीम म्हणतात: हे प्रेषिता, अल्लाह ची शपथ ज्याने तुम्हाला सत्यनिशी पाठविले, मी यापुढे कुणालाही काहीच मागणार नाही, ईथपर्यंत की मी जग सोडुन जाईल. मग प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम मरण पावले, नंतर खलीफा अबुबक्र सिद्दीक रजिअल्लाहु अनहु नी हकीम बिन हजाम रजिअल्लाहु अनहु ला बोलावले, की त्यांना माल द्यावी, परंतु त्यांनी स्वीकारण्यास नकार दिला, दुसरे खलीफा उमर बिन खत्ताब रजिअल्लाहु अनहु नी हकीम बिन हिजाम रजिअल्लाहु अनहु ना परत बोलाविले की त्यांना त्यांचा हिस्सा देण्यात यावा, परत त्यांनी स्वीकारण्यास नकार दिला, त्यावर हजरत उमर रजिअल्लाहु अनहु नी सर्वांसमोर घोषणा केली की: मुस्लीम बांधवांनो, मी यांना तो हक्क सादर करतो जो साक्षात अल्लाह ने यांना माल फै जो अविश्वासु कडुन विना युद्ध प्राप्त होतो पैकी ठरवुन दिला आहे, परंतु हे घेण्यास नकार देत आहेत, हकीम बिन हिजाम रजिअल्लाहु अनहु प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नंतर कुणाकडुन काहीच मागीतले नाही, ते ठाम राहिले शेवटी त्यांचा मृत्यू झाला.