عَنْ أُمِّ عَطِيَّةَ رَضيَ اللهُ عنها قَالَتْ:
تُوُفِّيَتْ إِحْدَى بَنَاتِ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ، فَخَرَجَ النَّبِيُّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ فَقَالَ: «اغْسِلْنَهَا ثَلاَثًا، أَوْ خَمْسًا أَوْ أَكْثَرَ مِنْ ذَلِكَ، إِنْ رَأَيْتُنَّ بِمَاءٍ وَسِدْرٍ، وَاجْعَلْنَ فِي الآخِرَةِ كَافُورًا -أَوْ شَيْئًا مِنْ كَافُورٍ-، فَإِذَا فَرَغْتُنَّ فَآذِنَّنِي»، قَالَتْ: فَلَمَّا فَرَغْنَا آذَنَّاهُ، فَأَلْقَى إِلَيْنَا حِقْوَهُ، فَقَالَ: «أَشْعِرْنَهَا إِيَّاهُ»، وَقَالَتْ: وَجَعَلْنَا رَأْسَهَا ثَلاَثَةَ قُرُونٍ.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 1258]
المزيــد ...
हजरत उम्मे अतिया रजिअल्लाहु अनहा कथन करतात की:
प्रेषितांच्या सलामती असो त्यांच्यावर एका मुलीचा अंत झाला, प्रेषित सलामती असो त्यांच्यावर बाहेर आले व म्हणाले:<<तिच्या मृतदेहाला तिन, किंवा पाच किंवा गरज भासल्यास अधिक वेळा स्नान करावे,पाणी व बेरीच्या पाना सोबत आणी शेवटच्या स्नानावेळी काफुर किंवा - मात्र काफुर- जरुर टाकावे, आणी हे सर्व पार पडल्यावर मला बोलवावे>>,
हजरत उम्मे अतिया सांगते की:जेव्हा आम्ही स्नान वगैरे पुर्ण केल्यावर प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर बोलाविले, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर आपला अंगावरील कपडा (शाल]) आम्हाला दिला,व सांगितले की:<<तिला यात गुंडाळा>> (म्हणजे तिच्या शरीराला या कपड्याने गुंडाळून घ्या)
आणी उम्मे अतिया सांगते की: तिच्या केसाला तिन वेण्या घातल्या.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 1258]
प्रेषितांची सलामती असो त्यांच्यावर मुलगी जैनब चा मृत्यु झाला, प्रेषित सलामती असो त्यांच्यावर महिला कडे आले, ज्या तिला स्नान देणार होत्या व म्हणाले:तिला पाणी व बेरिच्या पाना सोबत विषम संख्येत स्नान करावे, तिन, किंवा पाच, किंवा गरज भासल्यास अधिक जास्त वेळा द्यावे, आणी शेवटच्या स्नानावेळी मात्र काफुर टाकावे, आणी सर्व उरकल्यावर मला कळवावे. जेव्हा महिलांनी स्नान पुर्ण केले, त्यांनी प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर कळविले, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर आपला तहबंद (कपडा) दिला आणी सांगितले की:तिला या कपड्यात गुंडाळा,व हा कपडा शरीराला चिटकुन ठेवा, मग तिच्या केसाला आम्ही तिन वेण्यांनी गुंफले.