عَنِ ابْنِ عُمَرَ رَضيَ اللهُ عنهما قَالَ: قَالَ رَسُولُ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«إِذَا جَمَعَ اللهُ الْأَوَّلِينَ وَالْآخِرِينَ يَوْمَ الْقِيَامَةِ يُرْفَعُ لِكُلِّ غَادِرٍ لِوَاءٌ، فَقِيلَ: هَذِهِ غَدْرَةُ فُلَانِ بْنِ فُلَانٍ».
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم: 1735]
المزيــد ...
इब्न उमर रजिअल्लाहु अन्हु यांच्याकडून सांगितले की, रसूल अल्लाह ﷺ यांनी सांगितले:
"जेव्हा अल्लाह कयामतच्या दिवशी पहिले आणि शेवटचे (सर्व लोक) एकत्र जमवेल, तेव्हा प्रत्येक विश्वासघातीसाठी (धोकेबाजासाठी) एक ध्वज उभारला जाईल, आणि लोकांना सांगितले जाईल:
'हा अमुक अमुक व्यक्तीचा विश्वासघात आहे.'"
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم - 1735]
नबी करीम ﷺ सांगतात की, जेव्हा अल्लाह ताआला न्यायाच्या दिवशी सर्व पहिले आणि शेवटचे लोकांना हिशोबासाठी एकत्र जमवेल, तेव्हा जो कोणी अल्लाहशी किंवा लोकांशी केलेल्या वचनात फसवणूक करणारा असेल, त्याच्यासाठी एक चिन्ह उभारले जाईल ज्याद्वारे त्याची फसवणूक सर्वांसमोर उघड होईल, आणि त्या दिवशी त्याचे नाव घेऊन त्याची घोषणा केली जाईल. "हा अमुक ईबने अमुक याचा विश्वासघात आहे" — असे म्हणून त्याच्या वाईट कृत्याचे प्रदर्शन मैहशरचया मैदानातील सर्व लोकांसमोर केले जाईल.