विशेष वर्गीकरण: Seerah and History . Prophet's Biography . Muhammadan Qualities . Prophet's Guidance .

عَنْ أَبِي هُرَيْرَةَ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ قَالَ: قِيلَ: يَا رَسُولَ اللهِ ادْعُ عَلَى المُشْرِكِينَ قَالَ:
«إِنِّي لَمْ أُبْعَثْ لَعَّانًا، وَإِنَّمَا بُعِثْتُ رَحْمَةً».

[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم: 2599]
المزيــد ...

या भाषांतराला अधिक पुनरावलोकन आणि छाननीची आवश्यकता आहे.

हजरत अबु हुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात:जेव्हा विनवणी केली गेली:हे प्रेषिता अनेकेश्वरवाद्यांना श्रापित करा, तेव्हा प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम फरमाविले:
<<मला शिव्या शाप देण्यासाठी पाठविण्यात आले नाही, त्याऐवजी मला तर क्रॄपावंत व दयावंत बनवून पाठवण्यात आले आहे>>.

[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم - 2599]

स्पष्टीकरण

जेव्हा प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम विनवणी केली गेली कि त्यांनी अनेकेश्वरवादी लोकांना श्रापीत करावे, तेव्हा त्यांनी फरमावीले की:मला सर्वोच्च अल्लाह ने याकरता नाही पाठवले कि लोकांना (बद्दुआ) शाप देत बसावे, आणी लोकांना अल्लाह च्या दयेपासुन दुर करु, किंवा भलाई पासुन त्यांना वंचित करावे, माझे आगमन तर समस्त मानवजातीसाठी व विशेषतः ईमान धारकांसाठी दयेचा व क्रॄपावर्षाव ची मध्यस्ती करिता झाले आहे.

हदिसचे फायदे

  1. प्रेषितांचे सल्लल्लाहु अलैही व सल्लम मनाची विषालता व उच्च चारित्र्य स्पष्ट होते.
  2. आपल्या तोंडून कोणालाही शाप देणे योग्य नाही; तसेच अशा शिव्या आणि शापांपासून दूर राहणे हा रसूलांचा मार्ग आहे.
  3. सदर हदिस मध्ये शाप देण्या पासुन मनाई करण्यात आली आहे.
  4. तसेच लोकांना नरमाईची व दयेची वागणुक देण्याची उत्तेजना मिळते.
भाषांतरे दाखवा
भाषा: الإنجليزية الأوردية الإندونيسية अधिक (28)
अधिक