عَنْ جَابِرِ بْنِ سَمُرَةَ رَضيَ اللهُ عَنْهُ:
أَنَّ النَّبِيَّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ كَانَ إِذَا صَلَّى الفَجْرَ جَلَسَ فِي مُصَلَّاهُ حَتَّى تَطْلُعَ الشَّمْسُ حَسَنًا، وَقَالَ: كَانَ لَا يَقُومُ مِنْ مُصَلَّاهُ الَّذِي يُصَلِّي فِيهِ الصُّبْحَ أَوِ الغَدَاةَ، حَتَّى تَطْلُعَ الشَّمْسُ، فَإِذَا طَلَعَتِ الشَّمْسُ قَامَ، وَكَانُوا يَتَحَدَّثُونَ فَيَأْخُذُونَ فِي أَمْرِ الجَاهِلِيَّةِ، فَيَضْحَكُونَ وَيَتَبَسَّمُ.

[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم: 670]
المزيــد ...

Translation Needs More Review.

हजरत जाबीर बिन सुमराअ रजिअल्लाहु अनहु कथन करतात की:
प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम जेव्हा फज्र सकाळची नमाज अदा केल्यावर त्याच जागेवर बसुन राहत, तोपर्यंत जोपर्यंत सुर्य पुर्णपणे उगवत नाही, आणी फरमाविले:प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम जिथे फज्र ची नमाज अदा करत होते, सुर्य उगवे पर्यंत तिथेच बसुन राहत होते, मग जेव्हा सुर्य उजाडत असे, तेव्हा प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम उभे राहत, आणी सहाबा सुद्धा आपसात हसी मजाक व चर्चा करत होते, तसेच पुर्वीच्या काळातील आठवणींना उजाळा देत होते,हसत हसत थट्टा मस्करी सुद्धा करत होते, सोबत प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम सुद्धा स्मीत हास्य करत होते.

[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم - 670]

Explanation

प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम च्या पद्धतींपैकी एक आहे की, ते फज्र च्या नमाज नंतर आपल्या जागी बसत होते, इथपर्यंत सुर्य पुर्णपणे उगवत असे, जेव्हा सुर्य निघत असे तेव्हा प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम उभे राहत असत. सहाबा आपसात गप्पा गोष्टी करत होते, आणी इस्लाम पुर्वीच्या किस्स्यांना उजाडा देत, प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम सर्व गप्पा गुपचूप ऐकत असत व हसत चेहऱ्याने त्यांना प्रतिसाद देत होते.

Benefits from the Hadith

  1. फज्र नमाज नंतर सुर्य उगवे पर्यंत अल्लाह चे नामस्मरण व जप करण्यात मग्न होणे, आणी सामुहिक पणे बसणे पसंदिचे आहे, अट एवढी आहे की आजार नसावा.
  2. प्रेषितांचे सल्लल्लाहु अलैही व सल्लम चे उच्चतम चारित्र्य व नम्र स्वभाव, सोबत्यांसोबत बसत असत, त्यांच्या गप्पा गोष्टी ऐकत होते, व हसत सुद्धा होते.
  3. मस्जीद मधे गप्पा करणे, व पुर्वी काळातील आठवणींना उजाळा देण्यास हरकत नाही.
  4. हसणे बोलणे मान्य आहे, मनाई फक्त जोरजोरात तोंड फाडुन हसण्यात आहे.
Translation: English Indonesian Bengali Russian Vietnamese Tagalog Kurdish Hausa Portuguese Swahili Thai Assamese Dutch Gujarati Dari Hungarian الجورجية المقدونية الخميرية البنجابية
View Translations
More ...