عَنْ عَلِيٍّ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ قَالَ:
بَعَثَ النَّبِيُّ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ سَرِيَّةً فَاسْتَعْمَلَ رَجُلًا مِنَ الأَنْصَارِ، وَأَمَرَهُمْ أَنْ يُطِيعُوهُ، فَغَضِبَ، فَقَالَ: أَلَيْسَ أَمَرَكُمُ النَّبِيُّ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ أَنْ تُطِيعُونِي؟ قَالُوا: بَلَى، قَالَ: فَاجْمَعُوا لِي حَطَبًا، فَجَمَعُوا، فَقَالَ: أَوْقِدُوا نَارًا، فَأَوْقَدُوهَا، فَقَالَ: ادْخُلُوهَا، فَهَمُّوا، وَجَعَلَ بَعْضُهُمْ يُمْسِكُ بَعْضًا، وَيَقُولُونَ: فَرَرْنَا إِلَى النَّبِيِّ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ مِنَ النَّارِ، فَمَا زَالُوا حَتَّى خَمَدَتِ النَّارُ، فَسَكَنَ غَضَبُهُ، فَبَلَغَ النَّبِيَّ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ، فَقَالَ: «لَوْ دَخَلُوهَا مَا خَرَجُوا مِنْهَا إِلَى يَوْمِ القِيَامَةِ؛ الطَّاعَةُ فِي المَعْرُوفِ».
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 4340]
المزيــد ...
हजरत अली अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कथन करतात की:
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर एक लष्कर रवाना केले आणी त्यावर एका अंसारी सहाबीला प्रमुख नेमले, व त्या प्रमुखाचे आज्ञापालन करण्याचा आदेश पण दिला, तो प्रमुख रागाच्या भरात आपल्या सोबत्यांना उद्देशुन म्हणाला की:काय प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर माझ्या आज्ञापालनाचा तुम्हाला आदेश दिला नाही?
सोबती म्हणाले:होय का नाही,
तो म्हणाला:तर लाकडं जमा करा,
लाकडं जमा करण्यात आली,
मग तो म्हणाला:आता त्यामध्ये आग लावा,
त्या सर्वांनी त्या लाकडात आग लावली,
मग तो प्रमुख म्हणाला:आता या आगीत तुम्ही उडी मारा,
ते त्या आगीत उडी घेणारच होते, की ते एकमेकांना आलिंगन देऊ लागले, व म्हणाले: आम्ही सर्व प्रेषितांकडे सलामती असो त्यांच्यावर अग्नी पासुन वाचण्याकरता आलो होतो, तर मग त्यात का बरे जाऊ? परंतु
थोड्या वेळात ति आग विझली, व त्या प्रमुखाचा राग सुद्धा शांत झाला,
हा सर्व प्रकार प्रेषितांसमोर अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर मांडण्यात आला,
त्यावर प्रेषित सलामती असो त्यांच्यावर म्हणाले:<<जर ते त्या अग्नी मध्ये दाखल झाले असते तर कयामतच्या दिवसा पर्यंत त्यामधुन निघाले नसते; आज्ञापालन फक्त सत्कर्मातच आहे>>.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 4340]
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर एक लष्कर पाठवले व एका अंसारी सहाबीला प्रमुख नेमले, आणी ईतर साहाबांना आपल्या प्रमुखांचे आज्ञापालन करण्याचा आदेश दिला, परंतु त्या प्रमुखाला कुण्या कारणाने राग आला, व तो म्हणाला:काय प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर तुम्हाला माझे आज्ञापालन करण्याचा आदेश दिला नाही? ते सर्व म्हणाले:का नाही, तर त्याने हुकुम सोडला की:लाकडं जमा करावी, व त्यात आग लावा, मग त्या अग्नीत तुम्ही सर्व उडी मारा, नंतर ते अग्नी मध्ये उडी घेणारच होते की ते एकमेकांना बघु लागले. आणि म्हणाले: आम्ही तर प्रेषितांचे सलामती असो त्यांच्यावर अनुसरण अग्नी पासुन वाचवण्याकरता केले होते, मग आम्हीच अग्नी मध्ये का बरे दाखल व्हावे? त्यादरम्यान आग विझली, व प्रमुखाचा राग हि थमला. हा सर्व किस्सा प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर सांगण्यात आला, त्यावर प्रेषित सलामती असो त्यांच्यावर म्हणाले:जर ते अग्नी मध्ये दाखल झाले असते तर जगमिटेपर्यंत त्याच प्रकोपात झुंजले असते, व त्यातुन बाहेर निघाले नसते, कोणत्याही व्यक्ती चे अनुसरण निर्माणकर्त्याच्या आज्ञेविरुद्ध अमान्य आहे, आज्ञापालन फक्त नेकी व सदाचारातच आहे, दुष्कार्यात कदापिही नाही.