عَنْ جَابِرِ بْنِ عَبْدِ اللَّهِ رَضِيَ اللَّهُ عَنْهُمَا قَالَ:
كُنَّا فِي غَزَاةٍ فَكَسَعَ رَجُلٌ مِنَ المُهَاجِرِينَ رَجُلًا مِنَ الأَنْصَارِ، فَقَالَ الأَنْصَارِيُّ: يَا لَلْأَنْصَارِ، وَقَالَ المُهَاجِرِيُّ: يَا لَلْمُهَاجِرِينَ، فَسَمَّعَهَا اللَّهُ رَسُولَهُ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ: «مَا هَذَا؟» فَقَالُوا: كَسَعَ رَجُلٌ مِنَ المُهَاجِرِينَ رَجُلًا مِنَ الأَنْصَارِ، فَقَالَ الأَنْصَارِيُّ: يَا لَلْأَنْصَارِ، وَقَالَ المُهَاجِرِيُّ: يَا لَلْمُهَاجِرِينَ، فَقَالَ النَّبِيُّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ: «دَعُوهَا فَإِنَّهَا مُنْتِنَةٌ» قَالَ جَابِرٌ: وَكَانَتِ الأَنْصَارُ حِينَ قَدِمَ النَّبِيُّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ أَكْثَرَ، ثُمَّ كَثُرَ المُهَاجِرُونَ بَعْدُ، فَقَالَ عَبْدُ اللَّهِ بْنُ أُبَيٍّ: أَوَقَدْ فَعَلُوا، وَاللَّهِ لَئِنْ رَجَعْنَا إِلَى المَدِينَةِ لَيُخْرِجَنَّ الأَعَزُّ مِنْهَا الأَذَلَّ، فَقَالَ عُمَرُ بْنُ الخَطَّابِ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ: دَعْنِي يَا رَسُولَ اللَّهِ أَضْرِبُ عُنُقَ هَذَا المُنَافِقِ، قَالَ النَّبِيُّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ: «دَعْهُ، لاَ يَتَحَدَّثُ النَّاسُ أَنَّ مُحَمَّدًا يَقْتُلُ أَصْحَابَهُ».
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 4907]
المزيــد ...
हजरत जाबिर बिन अब्दुल्ला रजिअल्लाहु अनहु कथन करतात की:
आम्ही एका चढाईवर असतांना मुहाजीरा (मुळ चे मक्का रहिवासी) पैकी एका व्यक्तीने अंसार (मुळ मदिना रहिवासी) च्या एका व्यक्तीला मागुन हात मारला,
अंसारी व्यक्ती ने हाक दिली: अंसारी माझी मदत करा,
मुहाजीराने सुद्धा आरडाओरड केली:मुहाजीरांनो माझी मदत करा,
हा सगळा प्रकार प्रेषितांपर्यंत सल्लल्लाहु अलैही व सल्लम पोहचला, तेव्हा त्यांनी विचारपुस केली :<<काय घडले आहे?>>
लोकांनी सांगितले की:मुहाजिरा्पैकी एका ने अंसारातील एका व्यक्तीला मारले, त्यावर अंसारीने अंसारी लोकांना बोलाविले तर दुसरीकडे मुहाजिराने मुहाजिरींना जमा केले,
त्यावर प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले:<<
यापासुन दुर राहा, हे फार घाणेरडे क्रॄत्य आहे>>
जाबिर अल्लाह राजी असो त्यांच्याशी वर्णन करतात की: जेव्हा प्रेषित सलामती असो त्यांच्यावर मदिना ला आले, त्यावेळी अंसार ची संख्या जास्त होती, परंतु नंतर मुहाजिरिंच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ झाली,
या परिस्थितीवर अब्दुल्ला बिन उबई (दांभिकांचा सरदार) म्हणाला:इथपर्यंत परिस्थिती येऊन ठेपली ? अल्लाह ची शपथ! आम्ही जर मदिना परतलो तर उच्च ( ते आणी त्याचे सोबती), निच (प्रेषित सलामती असो त्यांच्यावर आणी त्यांचे सोबती) हाकलुन देणार,
हे ऐकुन ऊमर बिन खत्ताब अल्लाह राजी असो त्यांच्याशी म्हणाले:हे प्रेषिता!
मला परवानगी द्या, मी या दांभीकाची मान धडा पासुन वेगळी करतो,
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले:<< याला सोडुन द्या, लोकांनी असा आरोप करु नये की मुहम्मद आपल्या सोबत्यांनाच ठार करतो >>.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 4907]
प्रेषित सलामती असो त्यांच्यावर एका चढाई वर असतांना, सोबत मुहाजिर व अंसार या दोन्ही समुहातील लोकं शामील होते, मुहाजिरापैकी एका व्यक्तीने अंसारी पैकी एका व्यक्तीला पाठीमागुन हाताने मारले. त्यावर त्या अंसारी व्यक्ती ने आपल्या समुहाला हाक दिली, आणी मुहाजीराने आपल्या समुदायाला हाक दिली, सदर प्रकरण प्रेषितां सलामती असो त्यांच्यावर पर्यंत पोहचले असता, त्यावर प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी विचारले की: हे सर्व काय चाललंय? जेव्हा परिस्थिती त्यांनी समजुन घेतली, तेव्हा त्यांनी फरमावीले:या अंधकालीन प्रथेला थारा देऊ नका, कारण ही फार वाईट प्रथा व नापसंत आणी फार वेदनादायक आहे; खरोखर ही प्रथा अज्ञान कालीन रित होती की मनुष्य सत्य व असत्य न बघता, फक्त आपल्या समुदायाला हाक देतो, मग कुणावर जुलुम जबरदस्ती करो किंवा अत्याचाराने पिडित का असेना. हजरत जाबिर रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: सुरुवातीच्या काळात अंसार ची संख्या जास्त होती, परंतु काळांतराने मुआजिरांची संख्येमध्ये सुद्धा वाढ झाली. अशा वेळी अब्दुल्ला बिन उबै बिन सलुल ने अहंकाराने व दांभिकतेचे प्रदर्शन केले, तो म्हणाला की: आम्ही मदिना पोहचल्यावर उच्च वर्गीय, निच्च लोकांना हाकलुन देऊ, यावरुन त्याची दांभीकता स्पष्ट झाली. या घोषणेवर उमर बिन खत्ताब रजिअल्लाहु अनहु फार रागावले: त्यांनी प्रेषितांकडे चक्क त्याची मान धडावेगळी करण्याची परवानगी मागीतली, परंतु प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी यावर दुरगामी परिणाम बघता यावर अंमलबजावणी करण्याची परवानगी दिली नाही, कारण आम जनमानस ईस्लाम व मुसलमाना बाबत चुकीचा संदेश जाता कामा नये.