عَنْ ابْنِ عُمَرَ رَضِيَ اللَّهُ عَنْهُما أَنَّ رَسُولَ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«مَفَاتِحُ الغَيْبِ خَمْسٌ، {إِنَّ اللَّهَ عِنْدَهُ عِلْمُ السَّاعَةِ وَيُنْزِلُ الغَيْثَ وَيَعْلَمُ مَا فِي الأَرْحَامِ وَمَا تَدْرِي نَفْسٌ مَاذَا تَكْسِبُ غَدًا وَمَا تَدْرِي نَفْسٌ بِأَيِّ أَرْضٍ تَمُوتُ إِنَّ اللَّهَ عَلِيمٌ خَبِيرٌ}».
[صحيح] - [رواه البخاري] - [صحيح البخاري: 4627]
المزيــد ...
हजरत ईब्ने उमर रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले आहे की:
<<गुपित रहस्य च्या पाच चाब्या आहेत,
{निसंकोच एकमेव अल्लाह कडे कयामत चे ज्ञान आहे, आभाळातुन पाणी पाळणारा तोच आहे,
तोच जाणतो जे काही गर्भात दडलेले आहे, उद्या काय कमावणार, हे कोणताच जिव जाणत नाही उद्या कोण कुठे मरण पावणार, हे कुणालाच ठाऊक नाही,
निसंशय एकमेव अल्लाह सर्व काही जाणणारा आहे, सुक्ष्म खबर ठेवणारा आहे} >>.
[صحيح] - [رواه البخاري] - [صحيح البخاري - 4627]
पडद्याआड असणारे गुपित ज्ञान केवळ एकमेव अल्लाह कडेच आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुणीच त्याबाबतीत काहीच जाणत नाही, प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले आहे की, गुपितांच्या चाब्या आणी त्याचे खजीने पाच आहेत: १:कयामत कधी येईल, त्याचे ज्ञान फक्त एकमेव अल्लाह कडेच आहे, याचा ईशारा परलोकाच्या ज्ञाना कडे आहे, कारण कयामत चा दिवस म्हणजे परलोकाची सुरुवात असेल, जेव्हा सुरुवाती च्या ज्ञानापासुनच जणमानस अनभिज्ञ असेल तर मग नंतरच्या ज्ञाना वर प्रभुत्व असण्याचा प्रश्नच येत नाही. २:पाउस कधि पडेल, त्याचे संपुर्ण ज्ञान सुद्धा फक्त एकमेव अल्लाह कडेच आहे, हे ज्ञान आकाशामधील विषयाकडे लक्ष्य वेधते, कधि कधि पावसाचा अंदाज लावता येतो, परंतु तरिही पावसा बाबत स्पष्ट आणी अचुक अंदाज लावणे अशक्यच. ३:गर्भाशयात काय आहे; मुलगा किंवा मुलगी, काळा किंवा गोरा, परिपूर्ण आहे कि अपुर्ण, सदाचारी असेल की दुराचारी वगैरे, गर्भाशयाचा उल्लेख या साठी आला आहे, कारण लोकं याबाबत सुद्धा अंदाज लावतात, परंतु सखोल परोक्षाचे ज्ञान कुणालाच नसते, यावरुन सिद्ध होते की गुपित रहस्या चे ज्ञान तर अशक्यच आहे. ४:कोणतीच व्यक्तिं जाणत नाही की उद्या तो काय करणार, किंवा काय कमावणार आहे, जगामधील घडामोडी बाबत यात स्पष्ट इशारा आहे, उद्या शब्द याकरता वापरला गेला आहे, कारण तो अत्यंत जवळचा काळ प्रदर्शित करतो, जर एवढ्या जवळच्या दिवसावर मानवाची कोणतीच पकड नाही तर दुरच्या भविष्याचे ज्ञान कदापिही शक्यच नाही. ५-कोणत्याच सजिवाला माहित नाही की तो कोणत्या जमीनीवर मरण पावणार आहे, हा भुगर्भातील ज्ञानाकडे इशारा आहे, हालाकी अनेक लोकं आपल्या जन्मभुमितच मरण पावतात, परंतु तरी कुणीच अचुक सांगु शकत नाही की, कोणत्या ठिकाणी त्याला मृत्यु येईल, व त्याला कुठे दफन करण्यात येईल, मग त्याच्या पुर्वजांच्या कबरी तिथेच का असोनात, {निसंशय अल्लाह ज्ञानी व सर्व काही जाणणारा आहे} म्हणजे तो बाह्य व आंतरीक, लपलेले व उघड असलेले सर्व अवस्थेचे सखोल ज्ञान ठेवतो, या आयत मध्ये सर्व गुपित रहस्या च्या ज्ञानावर प्रकाश टाकला आहे, प्रत्येक खोट्या दाव्यांना खोडुन काढण्यात आले आहे.