عَنْ عُمَرَ بْنِ الخَطَّابِ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ:
أَنَّ رَجُلًا مِنَ اليَهُودِ قَالَ لَهُ: يَا أَمِيرَ المُؤْمِنِينَ، آيَةٌ فِي كِتَابِكُمْ تَقْرَؤُونَهَا، لَوْ عَلَيْنَا مَعْشَرَ اليَهُودِ نَزَلَتْ لاَتَّخَذْنَا ذَلِكَ اليَوْمَ عِيدًا، قَالَ: أَيُّ آيَةٍ؟ قَالَ: {اليَوْمَ أَكْمَلْتُ لَكُمْ دِينَكُمْ وَأَتْمَمْتُ عَلَيْكُمْ نِعْمَتِي وَرَضِيتُ لَكُمُ الإِسْلاَمَ دِينًا} [المائدة: 3] قَالَ عُمَرُ: قَدْ عَرَفْنَا ذَلِكَ اليَوْمَ، وَالمَكَانَ الَّذِي نَزَلَتْ فِيهِ عَلَى النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ، وَهُوَ قَائِمٌ بِعَرَفَةَ يَوْمَ جُمُعَةٍ.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 45]
المزيــد ...
उमर बिन खत्ताब अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर वर्णन करतात की:
एकदिवस एक यहुदी व्यक्ती त्यांना म्हणाला: हे ईमानधारकांचे ईमाम,
तुमच्या कुरआन मध्ये एक आयत अशी आहे, जर तशी आयत आम्हा यहुद्यांकडे अवतरली असती तर आम्ही त्या दिवसाला ईद चा दिवस म्हणुन साजरा केला असता,
उमर रजिअल्लाहु अनहु नि विचारले की कोणती आयत?
तो म्हणाला:{अलयवमाअकमलतु लकुम दिनकुम व अतममतु अलैकुम नियमती व रजितु लकुमुल ईस्लामा दिना} [अल माऐदा:3]
आज मी तुमच्या धर्माला नेहमीसाठी परिपुर्ण केले आहे, आणी असे करुन तुमच्यावर क्रॄपा केली, आणी तुमच्यासाठी धर्म म्हणुन ईस्लाम ची निवड केली आहे,
हजरत उमर रजिअल्लाहु अनहु फरमावितात की:मी तो दिवस सुद्धा जाणतो व आणी ती जागा सुद्धा जाणतो, जिथे सदर आयत प्रेषित मुहम्मदांवर सलामती असो त्यांच्यावर अवतरली, हि आयत जेव्हा प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर अराफात च्या मैदानात उभे असतांना अवतरली, आणी त्या दिवसी शुक्रवार होता.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 45]
एक यहुदी व्यक्ती उमर बिन खत्ताब अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कडे येउन म्हणाला की:कुरआन मध्ये एक अप्रतिम आयत आहे, जर तशी तौरात मध्ये अवतरली असती तर आम्ही त्या दिवसाला ईद साजरी केली असती,आणी त्या देणगी प्रति क्रॄतघ्नता म्हणुन हर्षोल्लास साजरा केला असता, उमर रजिअल्लाहु अनहु नि विचारले की:कोणती आयत? तो म्हणाला:{अलयवमाअकमलतु लकुम दिनकुम व अतममतु अलैकुम नियमती व रजितु लकुमुल ईस्लामा दिना}. त्यावर हजरत उमर बिन खत्ताब अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर म्हणाले:सदर आयत ज्या दिवसी अवतरली तो मुसलमाना करिता ईद चा दिवस होता, कारण तो शुक्रवार चा दिवस होता, प्रेषित सलामती असो त्यांच्यावर त्या वेळी अराफत मैदानात होते, आणी हे दोन्ही दिवस मुस्लीमांसाठी फार पवित्र व बरकतीने भरलेले आहेत.