عَنْ أَبِي هُرَيْرَةَ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ قَالَ: قَالَ النَّبِيُّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«مَا مِنَ الأَنْبِيَاءِ نَبِيٌّ إِلَّا أُعْطِيَ مَا مِثْلهُ آمَنَ عَلَيْهِ البَشَرُ، وَإِنَّمَا كَانَ الَّذِي أُوتِيتُ وَحْيًا أَوْحَاهُ اللَّهُ إِلَيَّ، فَأَرْجُو أَنْ أَكُونَ أَكْثَرَهُمْ تَابِعًا يَوْمَ القِيَامَةِ».
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 4981]
المزيــد ...
हजरत अबुहुरैरा अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कथन करतात की: प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले:
<<प्रत्येक पैगंबराला एक (निशाणी) चमत्कार दिल्या गेला आहे, ज्यावर लोकांनी ईमान आणावं, मला जे देण्यात आले आहे,ती वही आहे, मला पुर्ण विश्वास आहे की संपुर्ण प्रेषितांमध्ये माझेच अनुयायी सर्वात जास्त असतील>>.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 4981]
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर सविस्तर फरमाविले आहे की: तमाम पैगंबरांना सर्वोच्च अल्लाह ने स्पष्ट निशाण्या व चमत्कार प्रदान केले, ज्याद्वारे त्यांचे पैगंबरत्व सिद्ध झाले, ज्यांना बघुनच लोकं त्यांच्यावर ईमान आणत होते, आणी हे चमत्कार इतके मजबुत व प्रबल होते की लोकं त्याचा विरोध करुच शकत नव्हते, काही लोकं आपल्या हटधर्मीपणामुळे त्यांचा जाणुन बुजुन ईंकार करत होते. प्रेषितांचा सलामती असो त्यांच्यावर चमत्कार अप्रतिम कुरआन आहे, जो साक्षात अल्लाह ने पैगंबरावर अवतरीत केला; हा ईतका जबरदस्त चमत्कार आहे, जो सरासर आपल्या अनोख्या शैलीमुळे व नेहमी स्वीकारलेला, अतोनात फायदा संपन्न, व हमेशा बाकी राहणारा, या मध्ये आवाहन आहे, तसेच स्पष्ट प्रमाण सुद्धा आहे, येणाऱ्या संकटा ची भविष्यवाणी आहे, या कुरआन चा फायदा हजर व गैरहजर तसेच भविष्यात येणाऱ्या सगळयांनाच लाभणार आहे, म्हणुनच प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे:मला आशा आहे की कयामतच्या दिवसी माझ्या अनुयायांची संख्या संपुर्ण पैगंबरांच्या अनुयाया पेक्षा निश्चीतच जास्त राहणार.