عَنْ مُعَاذٍ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ:
أَنَّ النَّبِيَّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ لَمَّا وَجَّهَهُ إِلَى الْيَمَنِ أَمَرَهُ أَنْ يَأْخُذَ مِنَ الْبَقَرِ مِنْ كُلِّ ثَلَاثِينَ تَبِيعًا أَوْ تَبِيعَةً، وَمِنْ كُلِّ أَرْبَعِينَ مُسِنَّةً، وَمِنْ كُلِّ حَالِمٍ -يَعْنِي مُحْتَلِمًا- دِينَارًا أَوْ عَدْلَهُ مِنَ المَعَافِرِ، ثِيَابٌ تَكُونُ بِالْيَمَنِ.
[صحيح بشواهده] - [رواه أبو داود والترمذي والنسائي وابن ماجه وأحمد] - [سنن أبي داود: 1576]
المزيــد ...
हजरत मुआज अल्लाह राजी असो त्यांच्याशी वर्णन करतात की:
जेव्हा प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर मुआज बिन जबल अल्लाह राजी असो त्यांच्याशी ला यमन कडे रवाना केले, तेव्हा त्यांना आदेश दिला कि, गाय व बैलांची जकात दर ३० गायीवर एक तब्ब किंवा एक तबीया घेण्यात यावा, आणी दर ४० वर एक मुसिन्ना घेण्यात यावा,
प्रत्येक नवयुवका कडुन एक दिनार किंवा त्याबदल्यात यमनी कपड्यापैकी मआफरी कपडा घेण्यात यावा.
[صحيح بشواهده] - [رواه أبو داود والترمذي والنسائي وابن ماجه وأحمد] - [سنن أبي داود - 1576]
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर मुआज बिन जबल अल्लाह राजी असो त्यांच्याशी ला यमन कडे धर्माचे ज्ञान व ईस्लाम कडे बोलावण्याकरिता पाठवले, सोबतच मुस्लीमांकडुन जकात सुद्धा वसुल करावी, दर ३० गायींवर एक तबिआ नर किंवा मादी एक वर्ष वयाची असावी, आणी दर ४० गायींवर एक मुसिन्ना जी दोन वर्षाची असावी, घेण्यात यावी. त्याचप्रमाणे अहले किताब बंधु यहुदी व क्रिश्चनाकडुन जिझीया वसुल करण्यात यावा, प्रत्येक युवावस्थेत असणाऱ्या पुरुषा कडुन एक दिनार किंवा त्या बरोबर यमनी कपड्यातुन (मआफरी) घेण्यात यावी.