عَنْ أَبِي هُرَيْرَةَ رَضيَ اللهُ عنه قَالَ: قَالَ رَسُولُ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«الدُّنْيَا سِجْنُ الْمُؤْمِنِ وَجَنَّةُ الْكَافِرِ».

[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم: 2956]
المزيــد ...

Translation Needs More Review.

अबुहुरैरा रजिअल्लाहु अनहु द्वारा निवेदन आहे की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की:
<<हे जग श्रद्धावाना करता तुरुंग तर अविश्वासु करता स्वर्ग आहे>>.

[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم - 2956]

Explanation

प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की हे जग श्रद्धावान लोकांना तुरुंग समान आहे, कारण तो धर्माचे पालन करतो, म्हणजे सर्वोच्च अल्लाह च्या आदेशानुसार सत्कर्म करतो, व जे मना करण्यात आले आहे त्यापासुन दुरच राहतो, जेव्हा तो मरण पावतो या जगातील जबाबादारीतुन मुक्त होतो, व अशा सुंदर ठिकाणी पोहोचतो, जिथे साक्षात अल्लाह ने त्याच्या करता चांगला बदला ठेवला आहे, तसेच अविश्वासु करता हे जग स्वर्गा समान आहे, कारण तो आपल्या मर्जीनुसार जिवन जगतो, फक्त आपल्या ईच्छे चे अनुसरण करतो, जेव्हा तो मरण पावतो, तेव्हा भयानक अशा प्रकोपाकडे तो‌ वळतो, जे साक्षात अल्लाह ने त्याच्या करता तयार केले आहे.

Benefits from the Hadith

  1. ईमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की: प्रत्येक श्रद्धावान या जगात कैदी च्या अवस्थेत आहे, अर्थात कैदी असा की, त्याला हराम व अवैध तसेच वाईट सवयी पासुन दुर राहण्याचा आदेश दिला गेला आहे, व त्याला अल्लाह ची अशी भक्ती करण्याचा आदेश दिला आहे जे आम मनाला कठीण वाटते, जेव्हा तो‌ मरण पावतो तेव्हा तो सर्व क्रुत्यां पासुन मुक्त होतो, व‌ अशा अमर देणग्या कडे त्याची वाटचाल होते, जे अल्लाह ने त्याच्या करता तयार केली आहे, तिथे अशी अमर सफलता व चैन प्राप्त होते, की प्रत्येक कमतरता व वेदना पासुन मुक्त आहे,
  2. तसेच अविश्वासु करता जगात काही अंशी आनंद व सुख तर लाभते, परंतु ते फार क्षणीक व वेदनांनी भरलेलं, जेव्हा तो मरण पावतो तेव्हा हमेशा हमेशा करता यातनादायी प्रकोप त्याला बदल्यात मिळते.
  3. सिनदी रहमतुल्लाह म्हणतात की:
  4. हदिस च्या भाषेत (सिज्जीनील मोमीन)चा अर्थ आहे की ईमानधारक भलेही या जगात सुख चैन मधे असेल परंतु जन्नत [स्वर्ग] त्याच्या साठी कितीतरी पटीने जास्त आनंददायी असेल,
  5. व (जन्नतुल काफीर)चा अर्थ आहे,
  6. जर अविश्वासु या जगात परेशान असला तरीही [जहन्नम] नर्क त्याच्याकरता त्यापेक्षाही भयानक वेदनादायी असेल.
  7. या जगाची किंमत सर्वोच्च अल्लाह च्या नजरेत नगण्य आहे.
  8. हे जग श्रदधावंतासाठी परिक्षा व कसोटी समान आहे.
  9. अविश्वासु लोकांनी तात्पुरत्या स्वर्ग प्राप्त केलं पण त्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडुन हमेशा हमेशा राहणाऱ्या [जन्नत] स्वर्गापासुन ते मुक पावले.
Translation: English Urdu Spanish Indonesian Bengali Turkish Russian Bosnian Sinhala Indian Chinese Persian Vietnamese Tagalog Kurdish Hausa Portuguese Malayalam Swahili Tamil Thai Assamese amharic Dutch Gujarati Dari Romanian Hungarian Kannada الجورجية المقدونية الخميرية البنجابية
View Translations
More ...