عَنْ أَبِي مُوسَى رَضِيَ اللهُ عَنْهُ قَالَ: قَامَ فِينَا رَسُولُ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ بِخَمْسِ كَلِمَاتٍ، فَقَالَ:
«إِنَّ اللهَ عَزَّ وَجَلَّ لَا يَنَامُ، وَلَا يَنْبَغِي لَهُ أَنْ يَنَامَ، يَخْفِضُ القِسْطَ وَيَرْفَعُهُ، يُرْفَعُ إِلَيْهِ عَمَلُ اللَّيْلِ قَبْلَ عَمَلِ النَّهَارِ، وَعَمَلُ النَّهَارِ قَبْلَ عَمَلِ اللَّيْلِ، حِجَابُهُ النُّورُ -وَفِي رِوَايَةٍ: النَّارُ- لَوْ كَشَفَهُ لَأَحْرَقَتْ سُبُحَاتُ وَجْهِهِ مَا انْتَهَى إِلَيْهِ بَصَرُهُ مِنْ خَلْقِهِ».
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم: 179]
المزيــد ...
हजरत अबु मुसा अशअरी अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कथन करतात की: प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आमच्या दरम्यान उभे राहिले आणि त्यांनी आम्हाला पाच प्रमुख गोष्टी सांगितल्या:
<< संशय सर्वोच्च अल्लाह झोपत नाही, ना त्याच्या प्रतिभेला शोभते की त्याने झोपावे,
तो मिजान (तराजु) ला खाली करतो आणी वर करतो, रात्री चे कर्म दिवसा पुर्वीच त्याच्या दरबारी सादर होतात, तसेच दिवसा चे कर्म रात्र पुर्वीच सादर होतात,
त्याचा सभोवताल पडदा तोजोमय प्रकाश आहे, (हिजाब नुर ने व्यापलेला आहे) - एका कथनात आहे की: अग्नी-
जर त्या पडद्याला हटवले आणी जिथपर्यंत त्याची नजर गेली, त्या तेजा मुळे संपूर्ण निर्मिती जुळुन जाईल>>.
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم - 179]
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर आपल्या सहाबांना उद्देशुन पाच प्रमुख गोष्टी सांगितल्या: पहिली गोष्ट: सर्वोच्च अल्लाह झोपत नाही. दुसरी गोष्ट:अल्लाह चे झोपी जाणे अशक्य आहे, कारण त्याचे जिवन व अस्तित्व कमालीने परिपुर्ण आहे. तिसरी गोष्ट: सर्वोच्च अल्लाह तराजु झुकवतो व उंचावतो, अर्थात मनुष्याचे कर्म जे त्याच्या पर्यंत पोहचतात, त्यांचे वजन केल्या जाते, त्यांची रोजीरोटी जमीनीवर उतरविल्या जाते तिचे सुद्धा मोजमाप होते, उपजिवीका जी सर्व जिवांकरता ठरवलेली असते, अल्लाह च्या मर्जीनुसार कुणाला कमी, कुणाला जास्त दिल्या जाते. चौथी गोष्ट : मनुष्याचे रात्री चे कर्म दिवसा पुर्वीच त्याच्या दरबारी सादर केल्या जातात, आणी दिवसाचे कर्म रात्र पुर्वीच सादर होतात, अर्थात सुरक्षेवर नियुक्त फरिश्ते (देवदूत) रात्रीच्या कर्मांना पुर्ण झाल्यावर, दिवसाच्या सुरुवातीलाच वर घेऊन जातात, आणी दिवसाच्या कर्मांना पुर्ण झाल्यावर रात्रीच्या सुरुवातीलाच घेऊन जातात. पाचवी गोष्ट: सर्वोच्च अल्लाह चा पडदा तेजप्रकाश जो त्याच्या दर्शना आड आहे, एक (नुर) तेज आहे, आणी एका कथनात आगीचा उल्लेख आहे, जर त्याने त्या पडद्याला हटविले तर त्याच्या चेहऱ्याचा प्रकाश व तेज नुर नजरच्या हद्दिपर्यंत स्रॄष्टि ला जाळुन टाकेल;त्याच्या मुखाच्या तेजस्वी झळा म्हणजेच त्याचा प्रकाश, त्याचे वैभव आणि त्याची शोभा आहे. अर्थ असा आहे की: जर सर्वोच्च अल्लाह ने आपल्या चेहऱ्यावरील पडदा हटविला व आपल्या स्रॄष्टिवर आपले तेज टाकले तर त्याच्या चेहऱ्याचा तेज प्रकाश आपल्या हद्दीत येणाऱ्या सर्वच वस्तुंना भस्मसात करुन टाकेल; कारण त्याची नजर समस्त ब्रम्हांडाला व्यापलेली आहे, म्हणजेच सर्व स्रॄष्टी वर त्याचा प्रभाव पडतो.