عَنْ زِرِّ بْنِ حُبَيْشٍ قَالَ:
أَتَيْتُ صَفْوَانَ بْنَ عَسَّالٍ المُرَادِيَّ، أَسْأَلُهُ عَنِ المَسْحِ عَلَى الخُفَّيْنِ، فَقَالَ: مَا جَاءَ بِكَ يَا زِرُّ؟ فَقُلْتُ: ابْتِغَاءَ العِلْمِ، فَقَالَ: إِنَّ المَلاَئِكَةَ لَتَضَعُ أَجْنِحَتَهَا لِطَالِبِ العِلْمِ؛ رِضًا بِمَا يَطْلُبُ، فَقُلْتُ: إِنَّهُ حَكَّ فِي صَدْرِي المَسْحُ عَلَى الخُفَّيْنِ بَعْدَ الغَائِطِ وَالبَوْلِ، وَكُنْتَ امْرَأً مِنْ أَصْحَابِ النَّبِيِّ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ، فَجِئْتُ أَسْأَلُكَ: هَلْ سَمِعْتَهُ يَذْكُرُ فِي ذَلِكَ شَيْئًا؟ قَالَ: نَعَمْ، كَانَ يَأْمُرُنَا إِذَا كُنَّا سَفْرًا أَوْ مُسَافِرِينَ أَلَّا نَنْزِعَ خِفَافَنَا ثَلاَثَةَ أَيَّامٍ وَلَيَالِيهِنَّ إِلَّا مِنْ جَنَابَةٍ، لَكِنْ مِنْ غَائِطٍ وَبَوْلٍ وَنَوْمٍ، فَقُلْتُ: هَلْ سَمِعْتَهُ يَذْكُرُ فِي الهَوَى شَيْئًا؟ قَالَ: نَعَمْ، كُنَّا مَعَ النَّبِيِّ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ فِي سَفَرٍ فَبَيْنَا نَحْنُ عِنْدَهُ إِذْ نَادَاهُ أَعْرَابِيٌّ بِصَوْتٍ لَهُ جَهْوَرِيٍّ: يَا مُحَمَّدُ، فَأَجَابَهُ رَسُولُ اللهِ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ عَلَى نَحْوٍ مِنْ صَوْتِهِ: «هَاؤُمُ» وَقُلْنَا لَهُ: وَيْحَكَ اغْضُضْ مِنْ صَوْتِكَ، فَإِنَّكَ عِنْدَ النَّبِيِّ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ، وَقَدْ نُهِيتَ عَنْ هَذَا، فَقَالَ: وَاللَّهِ لاَ أَغْضُضُ، قَالَ الأَعْرَابِيُّ: المَرْءُ يُحِبُّ القَوْمَ وَلَمَّا يَلْحَقْ بِهِمْ، قَالَ النَّبِيُّ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ: «المَرْءُ مَعَ مَنْ أَحَبَّ يَوْمَ القِيَامَةِ»، فَمَا زَالَ يُحَدِّثُنَا حَتَّى ذَكَرَ بَابًا مِنْ قِبَلِ المَغْرِبِ مَسِيرَةُ عَرْضِهِ، أَوْ يَسِيرُ الرَّاكِبُ فِي عَرْضِهِ أَرْبَعِينَ أَوْ سَبْعِينَ عَامًا.
[صحيح] - [رواه الترمذي وابن ماجه وأحمد] - [سنن الترمذي: 3535]
المزيــد ...
हजरत जिर् बिन हुबैश वर्णन करतात की:
ते म्हणतात मी सफवान बिन अस्साल मुरादि कडे गेलो, त्यांना मोजांवर मसा बाबत विचारावे, त्यांनी सागीतले की:हे जिर् तुम्हाला ईथे कुणी खेचुन आणले?
मी म्हणालो:ज्ञाना चा शोध,
त्यांनी फरमावीले: निःसंशय (फरिश्ते) दुत ज्ञान संपादन करणाऱ्या व्यक्ती करता आपले पंख पसरवितात;त्या ज्ञानाच्या शोधामुळे ज्याला तो प्राप्त करु इच्छितो,
मी म्हणालो:मोजे घातल्यावर त्यावर मसाअ (शुद्धते करता हात फिरवणे) बाबत मला काही गोष्टी खटकतात, विशेष करुन लघवी व शौच उरकल्यावर, तुम्ही प्रेषितांच्या सलामती असो त्यांच्यावर सोबत्यांपैकी आहात, म्हणुन मी तुम्हाला विचारतो की, तुम्ही प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर या बाबत काही फरमावितांना बघितले?
ते म्हणाले:होय मी ऐकले आहे,
प्रेषित सलामती असो त्यांच्यावर आम्हाला स्पष्ट आदेश देत होते की, जेव्हा आम्ही प्रवासात असतांना, तिन दिवस व तिन रात्री आपले मोजे काढु नये, फक्त जनाबत (ज्यात आंघोळ जरुरी होते) च्या अवस्थे शीवाय, आणी लघवी, शौच किंवा झोपेमुळे मोजे काढण्याची गरज नाही, (अर्थात या अवस्थेत मसाअ पुरेसा आहे),
मी पुन्हा एक प्रश्न केला की:काय तुम्ही प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर कधि मनात उत्पन्न होणाऱ्या ईच्छा आकांक्षा बाबत काही फरमावितांना ऐकले?
ते म्हणाले:होय,
आम्ही एका प्रवासात प्रेषितांच्या सलामती असो त्यांच्यावर संगतीत असतांना, आम्ही प्रेषितां समवेत बसलो असतांना एक खेड्याचा माणुस आला व जोराने ओरडुन म्हणाला:हे मुहम्मद,
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर त्याला त्याच पद्धतीने आवाज दिला:<<हो>>
आम्ही त्या माणसावर चिडुन ओरडलो की:
खेद आहे तुझ्यावर, आवाज कमी कर, तुम्ही प्रेषितां सलामती असो त्यांच्यावर समवेत आहात, गप्प राहा,
तो ओरडुन म्हणाला: अल्लाह ची शपथ! मी आवाज कमी करणार नाही, व गप्पही बसणार नाही,
तो माणुस म्हणाला: मनुष्य एखाद्या समुहाशी प्रेम करतो, अलबत्ता अजुन त्या समुहा कडे तो पोहचला नाही,
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले:<<कयामत च्या दिवसी मनुष्य त्यांच्या समवेत असेल ज्यांच्याशी तो प्रेम करत होता>>,
तद्नंतर प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर आम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या, इथपर्यंत प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर एका पश्चीमे कडील दरवाजा चा उल्लेख केला, त्याची रुंदी एवढी अवाढव्य असेल की ती रुंदी पार करण्यासाठी एका स्वाराला चाळीस किंवा सत्तर वर्षांचा अवधी लागतो.
[صحيح] - [رواه الترمذي وابن ماجه وأحمد] - [سنن الترمذي - 3535]
जिर् बिन हुबैश सफवान बिन अस्साल अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर जवळ आले, व त्यांना मोजांवर मसाअ करण्याबाबत विचार लागले, सफवान अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर म्हणाले की:हे जर् तुम्हाला इथपर्यंत कुणी आणले? जिर् म्हणाले:ज्ञाना च्या व्याकुळतेने, सफवान अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर ऊत्तरले:निःसंशय फरिश्ते दुत ज्ञान संपादन करणाऱ्या व्यक्ती करता आपले पंख जमीनीवर पसरवीतात; त्याच्या या कार्यावर खुशीमुळे व त्याच्या आदरामुळे तसे करतात, जिर् म्हणाले:मला मनात शौचनंतर व लघवी नंतर मोजांवरील मसअ करण्याबाबत सतत प्रश्न खटकतो, तुम्ही प्रेषितांच्या अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर सहाबां पैकी आहात, म्हणुन मी तुमच्या कडे आलो, कधि तुम्ही प्रेषितांना अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर कधि याबाबत सविस्तर माहिती देताना ऐकलं आहे का? सफवान अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर म्हणाले:होय, प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आम्हाला आदेश देत होते की, जेव्हा आम्ही प्रवासात असु तेव्हा हदस ए असगर (शौच व लघवी) किंवा झोप मुळे तिन दिवस व तिन रात्री मोजे काढण्याची गरज नाही, परंतु जनाबत (ज्यामुळे आंघोळ जरुरी असते) च्या अवस्थेत मोजे काढणे जरुरी आहे, मी म्हणालो:तुम्ही कधि प्रेषितांना अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर प्रेमा बाबत माहिती देताना कधि ऐकले का? त्यांनी सांगितले की:हो, आम्ही एका प्रवासात प्रेषितांच्या अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर समवेत असतांना, एक अनोळखी खेड्याचा मनुष्य तिथे आला, व ओरडुन म्हणाला:हे मुहम्मद, प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर सुद्धा जवळजवळ त्याच्याच भाषेत उत्तर दिले: या, आम्ही त्या माणसाला उद्देशुन म्हणालो:खेद व दुःख आहे तुझ्यावर, तुझा आवाज खाली कर, तुम्ही पैगंबरा निकट आहात, आणी तुम्हाला प्रेषातांसमोर अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर गप्प बसणे जरुरी आहे. तो त्याच अर्वाच्च भाषेत ओरडुन म्हणाला: अल्लाह ची शपथ मी गप्प बसणार नाही, व आवाज कमी करणार नाही, तो माणुस विचारु लागला की:हे अल्लाह च्या पैगंबरा जर मनुष्य भल्या लोकांशी प्रेम करु लागतो परंतु त्यांच्या सारखे अद्याप आचरण करु शकत नाही? प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर फरमाविले: कयामत च्या दिवसी तो व्यक्ती त्यांच्यासोबत असेल ज्यांच्याशी तो प्रेम करत होता, जिर् सांगतात की: सफवान अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर आम्हाला सारखे हदिस समजावुन सांगत होते: इथपर्यंत की त्यांनी आम्हाला श्याम कडील तौबा च्या दरवाजा चा उल्लेख केला, ज्याला सर्वोच्च अल्लाह ने आकाश व पृथ्वीच्या जन्मावेळी निर्माण केले, त्याची रुंदी पार करण्यासाठी एका घोडेस्वाराला चाळीस किंवा सत्तर वर्षांचा कालावधी लागतो, आणी तो दरवाजा त्या दिवसापर्यंत बंद होणार नाही, जोपर्यंत सुर्य पश्चीमेकडुन उगवणार नाही.