+ -

عَنْ أَنَسِ بْنِ مَالِكٍ رَضيَ اللهُ عنهُ:
أَنَّ رَجُلًا دَخَلَ المَسْجِدَ يَوْمَ جُمُعَةٍ مِنْ بَابٍ كَانَ نَحْوَ دَارِ القَضَاءِ، وَرَسُولُ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَائِمٌ يَخْطُبُ، فَاسْتَقْبَلَ رَسُولَ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَائِمًا، ثُمَّ قَالَ: يَا رَسُولَ اللَّهِ، هَلَكَتِ الأَمْوَالُ وَانْقَطَعْتِ السُّبُلُ، فَادْعُ اللَّهَ يُغِيثُنَا، فَرَفَعَ رَسُولُ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ يَدَيْهِ، ثُمَّ قَالَ: «اللَّهُمَّ أَغِثْنَا، اللَّهُمَّ أَغِثْنَا، اللَّهُمَّ أَغِثْنَا» قَالَ أَنَسٌ: وَلا وَاللَّهِ، مَا نَرَى فِي السَّمَاءِ مِنْ سَحَابٍ وَلَا قَزَعَةً، وَمَا بَيْنَنَا وَبَيْنَ سَلْعٍ مِنْ بَيْتٍ وَلَا دَارٍ، قَالَ: فَطَلَعَتْ مِنْ وَرَائِهِ سَحَابَةٌ مِثْلُ التُّرْسِ، فَلَمَّا تَوَسَّطَتِ السَّمَاءَ انْتَشَرَتْ، ثُمَّ أَمْطَرَتْ، فَلَا وَاللَّهِ، مَا رَأَيْنَا الشَّمْسَ سِتًّا، ثُمَّ دَخَلَ رَجُلٌ مِنْ ذَلِكَ البَابِ فِي الجُمُعَةِ، وَرَسُولُ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَائِمٌ يَخْطُبُ، فَاسْتَقْبَلَهُ قَائِمًا، فَقَالَ: يَا رَسُولَ اللَّهِ، هَلَكَتِ الأَمْوَالُ، وَانْقَطَعَتِ السُّبُلُ، فَادْعُ اللَّهَ يُمْسِكْهَا عَنَّا، قَالَ: فَرَفَعَ رَسُولُ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ يَدَيْهِ، ثُمَّ قَالَ: «اللَّهُمَّ حَوَالَيْنَا وَلَا عَلَيْنَا، اللَّهُمَّ عَلَى الآكَامِ وَالظِّرَابِ، وَبُطُونِ الأَوْدِيَةِ، وَمَنَابِتِ الشَّجَرِ» قَالَ: فَأَقْلَعَتْ، وَخَرَجْنَا نَمْشِي فِي الشَّمْسِ، قَالَ شَرِيكٌ: سَأَلْتُ أَنَسَ بْنَ مَالِكٍ: أَهُوَ الرَّجُلُ الأَوَّلُ؟ فَقَالَ: «مَا أَدْرِي».

[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 1014]
المزيــد ...

Translation Needs More Review.

अनस बिन मालीक रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की:
एक व्यक्ती शुक्रवारी मस्जीद मधे त्या दरवाजा मधुन दाखल झाला, जिकडे दारुल कजा(न्याय निवाडा) असायचा, त्यावेळी प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर (खुतबा) लोकांना संबोधित करत होते, तो व्यक्ती प्रेषितांसमोर अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर उभा झाला व ओरडुन म्हणाला:हे प्रेषिता, मालपाणी नष्ट झाले, रस्ते सुद्धा बंद झाले, अल्लाह कडे दुआ करावी जेणेकरून पाणी वर्षावे, बस्स प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आपले दोन्ही हात दुआ याचना करता उचलले, व म्हणाले:<<हे अल्लाह आम्हावर पावसाळ्याचा क्रुपा वर्षाव कर, हे अल्लाह आमच्याकडे पावसाळ्याचा क्रुपा वर्षाव कर, हे अल्लाह आमच्यावर पावसाळ्याचा क्रुपा वर्षाव कर>> हजरत अनस वर्णन करतात की:अल्लाह ची शपथ, त्यावेळी आम्ही आकाशात कुठलेही ढग पाहत होते नव्हतो, न एखादा ढगाचा तुकडा, तसेच आमच्या व सिल पहाडा दरम्यान कोणतिच ईमारत व घर नव्हते, ते म्हणतात की:मग काय आम्ही बघतो तर अचानक त्या पहाडा मागुन एक ढग मोठ्या ढालीप्रमाणे उगवले, तो ढग आकाशा दरम्यान पोहचल्यावर पुर्ण पसरला, व पाण्याचा वर्षाव सुरू झाला, अल्लाह ची शपथ, आम्ही त्यावेळी तब्बल सहा दिवस सुर्य बघितलाच नाही, मग पुढच्या शुक्रवारी त्याच दरवाज्यातुन एक व्यक्ती दाखल झाला, ज्यावेळी प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर लोकांना संबोधित करत होते, तो व्यक्ती प्रेषितांसमोर उभा राहिला व म्हणाला, हे अल्लाह च्या प्रेषिता, आम्ही बरबाद झाले, रस्ते बंद झाले, अल्लाह कडे आपण दुआ याचना करावी, की आता पाऊस थांबवण्याची विनवणी करावी, बस्स प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आपले दोन्ही हात दुआ याचना करता उचलले व म्हणाले:<<हे अल्लाह! आमच्या आजुबाजुने पाउस पडावा परंतु आमच्यावर न वर्षाव, हे अल्लाह! पाउस टेकड्यांवर, जंगलात व व्रुक्षा करता जरुर अवतरीत कर>> हजरत अनस सांगतात की:बस्स आम्ही काय बघतो, पाउस पुर्णपणे थांबला, आणी‌ आम्ही उन्हात बाहेर पडलो, शरीक ने अनस बिन मालीक रजिअल्लाहु अनहु ला विचारले की:काय हा व्यक्ती तोच आहे,जो पहिल्या वेळी आला होता? त्यांनी सांगितले की: <<मला माहित नाही>>.

[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 1014]

Explanation

एक खेड्याचा माणुस शुक्रवारी प्रेषितांच्या अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर मस्जीद मधे पश्चीमी दरवाजा कडुन दाखल झाला, जो उमर बिन खत्ताब रजिअल्लाहु अनहु च्या घरासमोर होता, त्यावेळी प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर लोकांना (खुतबा) संबोधित करत होते, तो व्यक्ती समोर उभा राहून म्हणु लागला की:हे अल्लाह च्या प्रेषिता, जनावरे हलाक झाली, त्यामुळे लोकांना नेआण करता पर्याय नसल्यामुळे रस्ते सुनसान झाली, बस्स तुम्ही सर्वोच्च अल्लाह कडे दुआ याचना करावी की, आमच्यावर पाउस पाडण्याची क्रुपा करावी. त्यावर प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर आपले दोन्ही हात दुआ करता उचलले, व म्हणाले: हे अल्लाह आमच्यावर पाण्याचा वर्षाव कर, हे अल्लाह आमच्यावर पाण्याचा वर्षाव कर, हे अल्लाह आमच्यावर पाण्याचा वर्षाव कर, हजरत अनस बिन मालीक रजिअल्लाहु अनहु सांगतात की: अल्लाह ची शपथ त्यावेळी आकाश पुर्णपणे कोरडे होते, कुठलाच ढिगाळ नव्हते, मस्जीद व सिल पहाड दरम्यान कोणतेच घर किंवा ईमारत नव्हती,की ज्यामुळे आकाश अस्पष्ट दिसावे. हजरत अनस बिन मलिक रजिअल्लाहु अनहु सांगतात की: अचानक त्या टेकडी मागुन एक ढग दिसु लागले, जो एखाद्या ढाल खालीलप्रमाणे दिसत होते, जसे एखादे लहान ताट दिसते तसे, मग जेव्हा तो ढग मदिना च्या मध्य आकाशात पोहचला तेव्हा तो पुर्ण आकाशात पसरला आणी पावसाळा सुरू झाला, अल्लाह ची शपथ, सतत पावसाळ्या मुळे आम्ही पुढच्या शुक्रवार पर्यंत सुर्य बघितलाच नाही, मग पुढच्या शुक्रवारी तोच व्यक्ती पुन्हा त्याच दरवाज्यातुन दाखल झाला, जेव्हा प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर लोकांना खुतबा संबोधित करत होते, तो प्रेषितांसमोर उभा झाला व म्हणाला:हे अल्लाह च्या प्रेषिता, मालपाणी बरबाद झाले, रस्ते सुनसान झाले, बस्स अल्लाह कडे दुआ करा की त्याने बरसात थांबवावी. कथन करणारे सांगतात की:प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आपले दोन्ही हात दुआ करता उचलले व म्हणाले:हे अल्लाह वर्षाला आमच्या आजुबाजुने पाड, आमच्यावर नको, हे अल्लाह उंच ठिकाणावर जसे टेकड्यांवर, नदि नाल्यांमध्ये, झाडाझुडुपांमध्ये पाउस पाडावा. हजरत अनस सांगतात की:आम्ही काय बघतो की, पाण्याने भरलेला ढग आपोआप गायब झाला, व‌ आम्ही भर उन्हात बाहेर पडलो.

Benefits from the Hadith

  1. रोजी उपजिवीके करता विविध मार्गाने प्रयत्न करणे, जसे दूआ (याचना) करणे, आणी जमीनीत (मेहनत) मजदुरी करणे, अल्लाह वर असलेल्या ठाम विश्वासात अडथळा निर्माण करत नाहीत.
  2. पावसाळ्या करता प्रेषितांची (अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर) दुआ करणे आवडीचे क्रुत्य आहे.
  3. जेव्हा अतिवृष्टी झाली तर तिच्या थांबण्याची व‌ वातावरण स्पष्ट होण्यासाठी अल्लाह कडे दुआ याचना करणे वैध आहे, आणी ही दुआ सुद्धा वैध आहे, की ती अतिवृष्टी अन्यत्र वळावी, जसे टेकड्यांवर, नदि नाल्यांमध्ये, झाडाझुडुपांमध्ये वर्षा उतरवावी, कारण त्यात अतोनात फायदे आहेत.
  4. जिवंत व सत्कर्मी लोकांकडे दुआ याचना करण्याची विनवणी करणे वैध आहे, या पद्धतीने (मध्यस्थी) याचना करणे अगत्याचे आहे,
  5. दुसरीकडे अन्य मार्गाने जसे मृतक व्यक्ती द्वारे किंवा जिवंत व्यक्ती कडे दुआ करणे अवैध आहे, कारण तो मार्ग (शिर्क) अनेकेश्वरवादा कडे जातो, जो पुर्णत अमान्य आहे.
  6. दुआ मध्ये वारंवार एकाच शब्दाचा उच्चार करणे पसंदप्राप्त आहे.
  7. अत्यावश्यक वेळी शुक्रवार च्या संबोधना वेळी प्रवक्त्याशी बोलण्यात काहीच गैर नाही.
  8. पाऊस पाडण्यात व थांबवण्यात, सर्वशक्तीमान अल्लाह च्या कुदरत ची एक निशाणी आहे.
  9. प्रेषितांची अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर दुरदृष्टी जाणवते, कि त्यांनी फक्त नुकसाना जागी पाउस थांबण्याची दुआ केली, प्रत्येक ठिकाणाहुन नाही.
  10. ऐन खुतबा वेळी पाउसाची दुआ करणे सुद्धा मंजुर आहे.
  11. दुआ करतांना हात उंचावणे मंजुर आहे;कारण त्याद्वारे एका दासाची कमजोरी प्रदर्शित होते, दुआ वेळी हात उचलण्या बाबत ज्ञानवंताचे एकमत आहे.
  12. सदर हदिस प्रेषितांच्या अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर प्रेषितत्वाचे जिवंत उदाहरण आहे, कारण प्रेषितांच्या अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर विनवणी वर पाऊस पडला व थांबला सुद्धा.
Translation: English Urdu Spanish Indonesian Uyghur Bengali French Turkish Russian Bosnian Sinhala Indian Chinese Persian Vietnamese Tagalog Kurdish Hausa Portuguese Swahili Thai Assamese Dutch Gujarati Dari Hungarian الجورجية المقدونية الخميرية
View Translations
More ...